About Us
" प्राजक्तराज " द्वारे आम्ही ७० - ८० वर्ष व त्याहून जुने पारंपरिक मराठी अलंकार, त्यांच्या मूळ स्वरूपात (in original designs) त्यात कोणतेही बदल न करता, अभ्यासपूर्वक तुमच्या समोर आणत आहोत.
पूर्वीचे बहुतांश अलंकार, सोन्या-चांदी मध्ये बनतात. परंतू आता मराठी अलंकारांचा प्रचार - प्रसार व्हावा, ते अधिकाधिक वापरात यावेत ह्या हेतूनं, आम्ही एक नवीन प्रयोग करून, सोन्या - चांदीबरोबरच हे अलंकार, तांबं या धातूत बनवून, त्याला गोल्ड प्लेटिंग करून 'इमिटेशन' स्वरूपात आणत आहोत, जे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील व हुबेहूब सोन्यासारखे दिसतील.
अलंकारांच्या या शृंखलेमध्ये
- सोन्याच्या अलंकारांना - तुळजा
- चांदीच्या अलंकारांना - म्हाळसा
- तांबं धातू इमिटेशनच्या दागिन्यांना - सोनसळा
राज ह्या शब्दात श्रीमंती आहे, हुकूमत, घरंदाजपणा आहे. लोप पावत चाललेली महाराष्ट्राची ही अलंकारांची श्रीमंती आम्ही प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करतोय.
म्हणून .. या प्रयत्नांचं नाव - " प्राजक्तराज "