तोडे म्हणजे चांदीच्या कड्या एकात एक बसवून केलेला दागिना.मराठी अलंकारामधील ‘राजबिंडा’ अलंकार म्हणजे शिंदेशाही तोडा. नावाप्रमाणेच हा अलंकार ‘शाही’ आहे. दागिने घडविणे हे मुळातच अतिशय कौशल्याचे काम आहे. शिंदेशाही तोडे पाहिल्यावर तर ह्याची खात्री पटते.एखाद्या इलॅस्टिक बॅन्ड सारखा ॲडजस्टेबल असणारा हा तोड्याचा प्रकार आहे. तो अनेक छोट्या छोट्या पट्ट्यांची गुंफण करुन बनतो. ह्यातील प्रत्येक पट्टी स्वतंत्ररित्या घडविली जाते. हातात घालताच सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे हे तोडे मराठी दागिन्यांचे भूषण आहेत.
ह्या चित्रातील स्त्रीच्या शालीन सौंदर्यात तिच्या हातातील शिंदेशाही तोडे कशी भर घालत आहेत पहा.