पुरण पाटली
भारतात फार पूर्वीपासून बांगडी वापरात आहे. मोहें-जो-दडो येथील उत्खननात मिळालेल्या एका स्त्रीमूर्तीच्या हातभर बांगड्या घातलेल्या आढळून आल्या आहेत. तसेच मातीच्या रंगीत बांगड्याही उत्खननात सापडल्या आहेत. महाराष्ट्रात तर स्त्री मग ती कुमारिका असो वा सुवासिनी तिच्या हातात बांगडी हवीच. हात भुंडा असू नये. बांगड्यांच्या विविध प्रकारातील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे पाटल्या. बांगडीपेक्षा किंचित जाड असणाऱ्या पाटल्या सुकुमार हातात उठून दिसतात.
पैलू पाटली
बांगड्या – तोडे – हिरवा चुडा ह्यांच्या बरोबरीने सौभाग्य चुड्यात छान दिसतातच पण नुसत्या पाटल्या घातल्या तरी उठून दिसतात. पेशवाईतील एक मुत्सद्दी म्हणून प्रसिद्ध असणारे नाना फडणवीस त्यांच्या विद्वत्तेबरोबर रसिकतेसाठीही प्रसिद्ध होते. त्यांच्या उपलब्ध पत्र व्यवहारात दागिन्यांच्या खरेदीचे अनेक उल्लेख आहेत. त्यातही पाटल्यांचे असंख्य उल्लेख आहेत. असा पाटली जोड आपल्या संग्रही हवाच.
- मह्या मनाची हाऊस - सांगल सेताच्या सेतात
कडे पाटल्या हातात - सोनं टाकावं नथात ।
- कापडाच्या गाडया, गाडया पेठेला दाटल्या |
हौशा राजसानं, केल्या सोनीयाच्या पाटल्या
- शेर सोनियाच्या रखमाईच्या पाटल्या
खरं बोलावं इठ्ठला किती मोहरा आटल्या