छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘राजकोश’ ह्या ग्रंथात नथीला ‘नासमणि’ असे म्हटले आहे कारण तो नाकात घालावयाचा अलंकार आहे. हा महाराष्ट्रीयन स्त्रियांचा अतिशय आवडता दागिना आहे.
सर्व दागिन्यांचे नाक म्हणजे नथ. ही मोत्यांपासून तयार केलेली असते. मोती हे अतिशय शुभ मानले जाणारे महारत्न आहे. ते चंद्राचे प्रिय रत्न आहे. मोती म्हणजे सौन्दर्य, शुद्धता आणि उदात्तता. ज्या घरात मोत्यांचा वापर असतो ते घर लक्ष्मी आपले निवासस्थान म्हणून निवडते अशी प्राचीन धारणा आहे म्हणूनच राजे – रजवाडे रोज जे दागिने परिधान करीत ते बहुधा मोत्याचे असत.
मोत्याची नथ हे महाराष्ट्रात स्त्रियांचे सौभाग्यचिन्ह मानले जाते. असे मानले जाते की मोती धारण केल्यामुळे अरिष्टांचा नाश होतो आणि सुख-सौभाग्य प्राप्त होते. म्हणून महाराष्ट्रात अशी सार्वत्रिक धारणा आहे की स्त्रियांनी मोत्याची नथ घातल्यास त्यांचे सौभाग्य वाढते, म्हणून मुलीला लग्नात नथ आवर्जून दिली जाते.
बालगंधर्वांच्या नाकातील ठसठशीत नाथ त्यांच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे. किंबहुना एकाच महाराष्ट्राची दोन आभूषणे – बालगंधर्व आणि नथ !
अनेक मराठी अभिनेत्रींनी ठसठशीत मोत्याची नथ परिधान केलेली आपल्याला पाहायला मिळते.
सुलोचना लाटकर -
ललिता पवार
सीमा देव
स्मिता पाटील