तन्मणी हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे
मध्यभागी हिरेमाणकाचे पदक व दोन्ही बाजूंनी टपोऱ्या मोत्याचे सर जोडलेला तन्मणी प्रत्येक महाराष्ट्रीयन स्त्रीला भुरळ घालणारा दागिना आहे. ह्या दागिन्याच्या मध्यभागी जे हिऱ्याचे पदक असते त्याला खोड असे म्हणतात. पेशवाईत तन्मणी विशेष लोकप्रिय झाल्याचे दिसते.
एका ओवीत भावाने बहिणीला भाऊबीजेची भेट म्हणून तन्मणी दिल्याचा उल्लेख आहे –
“भाऊबीजे दिवशी भाऊ घालतो ओवाळणी | त्यानं ताटामधी टाकीला तन्मणी ।“