जोंधळ्याच्या दाण्यासारखे सोन्याचे छोटे मणी तयार करून त्यांची बनवलेली माळ ‘जोंधळी पोत’ या नावाने ओळखली जाते.
जोंधळी पोत हा महाराष्ट्रात वापरला जाणारा एक पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यात घालण्याचा दागिना आहे. जोंधळ्याचे छोटे छोटे मणी एकत्र करून ही पोत बनवली जाते. छोट्या छोट्या मण्यांपासून बनवलेली ही पोत खूप नाजूक आणि सुरेख दिसते. तीन पदरी पासून ते दहा पदरी पर्यंत जोंधळी पोत बनवली जाते.
जोंधळे म्हणजेच धान्य हे समृध्दीचं प्रतीक आहे, म्हणूनही हा दागिना आवडीने घातला जातो.