सोन्याच्या टपोऱ्या आकाराचे मणी एका सरात गुंफून तयार केलेली माळ एकदाणी या नावाने ओळखली जाते. त्याशिवाय एकदाणीप्रमाणेच ‘एकलड’, ‘एकसर’, ‘एकावळी’ अशीही नावे प्रचारात आहेत.
गानहिरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिराबाई बडोदेकर – तिकीट लावून गायनाचा कार्यक्रम करण्यास सुरवात करणाऱ्या पहिल्या स्त्री-गायिका, ज्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत घराघरात पोहचविले – खरे तर त्यांचा स्वर हाच त्यांच्या कंठाचे खरे आभूषण पण ही एकदाणीसुद्धा त्यांना किती खुलून दिसते आहे.
खालील फोटोत प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांनी एकदाणी परिधान केलेली दिसत आहे.